Hanuman Sena News

कुंकू कसे व का लावावे ?



सुयोग शर्मा
विशेष प्रतिनिधी

लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे.उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.प्रस्तुत लेखात आपण कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ, कुंकू कधी अन् कसे लावावे, एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला कपाळावर कुंकू कसे लावावे, सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य का, यांविषयीच्या कृती त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय कारणांसहित जाणून घेऊया.कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ‘कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या (चेहर्‍याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण करते ‘कमळ हे साकारस्वरूप, कुंकू हे शक्तीस्वरूप, तुळस हे श्रीकृष्णतत्त्वस्वरूप, तर बेल हे शिवस्वरूप आहे.’
 कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होणे‘कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्‍या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होऊन वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.’ – ब्रह्मतत्त्व कुंकवाचा गंध, रंग आणि शक्ती यांमुळे होणार्‍या लाभाचे प्रमाण आणि जिवावर होणारा परिणाम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावणे
आंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावावे. कपाळाला कुंकू चिकटण्यासाठी मेणाचा वापर करावा. कपाळावर प्रथम मेण लावून त्यावर कुंकू लावावे.अनामिकेने कपाळावर कुंकू लावण्यामागील शास्त्र
‘अनामिकेतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वात्मक लहरींच्या साहाय्याने कुंकवातील शक्तीतत्त्व अल्प कालावधीत जागृत होऊन प्रवाही बनून आज्ञाचक्रात संक्रमित होत असल्याने तिच्यातील रजोगुणाच्या कार्याला शक्तीरूपी बळ प्राप्त होते.’ एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला कपाळावर कुंकू लावणे एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करण्यामागील शास्त्र
‘पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांनी दुसर्‍यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करावा; कारण दुसर्‍याला स्पर्श करतांना त्याच्यातील वाईट शक्तीचे संक्रमण आपल्या देहात बोटाच्या माध्यमातून होऊ शकते; म्हणून तेजाचे प्राबल्य असलेल्या मध्यमेच्या वापरातून स्वतःच्या देहाचे संरक्षण साधले जाते.’एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीच्या आज्ञाचक्रावर कुंकू लावल्यावर दोन्ही स्त्रियांना होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र कुंकवामध्ये शक्ती असते. कुंकू लावणे, हे पूजा करणे, इतरांना सन्मानित करणे यांसारखे कर्म असल्याने कुंकू लावणार्‍या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकूमधील चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात हातातून देहात पसरते. कुंकू लावल्याने स्त्रीकडे शक्तीचे कण प्रक्षेपित होतात. त्यामुळे तिच्यावर आध्यात्मिक उपाय होतात आणि तिचे रज-तमापासून रक्षण होते. तसेच त्यामुळे तिचे मन शांत रहाते. साधकाच्या साधनेनुसार देवता किंवा ईश्वर याच्याशी कुंकू लावलेल्या स्त्रीचे अनुसंधान १ टक्क्याने वाढू शकते.’ – सौ. वाले स्त्रियांनी भांगात कुंकू किंवा सिंदूर भरल्याने होणारे लाभ पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत रहाणे
‘सुवासिनी स्त्रियांच्या भांगातील कुंकू किंवा सिंदूर पाहून हिंदु पुरुषांना शत्रूशी लढण्यासाठी मारक शक्ती आणि चैतन्य मिळून त्यांची क्षात्रवृत्ती अन् उत्साह वाढत असे. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी स्त्रियांनी कुंकू किंवा सिंदूर यांचा कपाळावर किंवा भांगात लावण्यास वापर करणे, हे मानसिक आणि आध्यात्मिक या दोन्ही कारणांसाठी योग्य आहे. (युद्धासाठी जाणार्‍या पुरुषांनीही सतत स्वतःला सात्त्विकता, मारक शक्ती आणि चैतन्य मिळण्यासाठी कपाळाला कुंकू किंवा सिंदूर याचा टिळा लावावा.) वाईट शक्तींपासून संरक्षण
स्त्रियांचे मस्तक पुरुषांच्या मस्तकाच्या तुलनेत मऊ आणि संवेदनशील असते. केसातील भांगाचा भाग हा मध्यभागी असल्याने तो सर्वाधिक संवेदनशील असतो. या भागाचे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी भांगात सिंदूर भरला जातो.सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य
कुंकवातील मारक तत्त्वामुळे स्त्रीच्या सूक्ष्मदेहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होते आणि कुंकवातील चैतन्यामुळे तिचा सूक्ष्मदेह सात्त्विकता ग्रहण करतो. त्यामुळे त्याची शुद्धी होण्यास साहाय्य होते. सिंदुरामध्ये कुंकवाच्या तुलनेत मारक तत्त्व अल्प प्रमाणात असते; त्यामुळे सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य आहे

Post a Comment

Previous Post Next Post