Hanuman Sena News

हिंदुजनजागृती समिती कडुन 'श्रद्धा'च्या हत्याऱ्याला फाशी व 'लव्ह जिहाद विरोधी' कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी निवेदन!


            नांदुरा:"मुलगी म्हणजेच कन्यारत्न " !आपल्या देशातील प्रत्येकच धर्मात या कन्येचे महत्व अनमोल आहे.आपण कन्येची देवी म्हणून पूजा करतो, मात्र याच मुलीवर जर अत्याचार होत असतील, तिची निर्घृणपणे हत्या होत असेल तर खरोखरचं संपूर्ण देश हादरून देशात संतापजनक वातावरण निर्माण होईल. पालघर आफताब पुनावाला याने निष्पाप श्रद्धाची निर्घृण हत्या करून ३५ तुकडे केले. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ही केवळ पहिली घटना नसून काही दिवसापूर्वी मुंबईतील टिळकनगर येथे राहणारी रुपाली चंदनशिवे या युवतीनेने बुरखा घालण्यास नकार दिला. म्हणून तिचा पती मोहम्मद शेख याने तिची गळा चिरून हत्या केली होती. अशाच लव्ह जिहादच्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह राज्यभरात उपडकीस आल्या आहेत. एकूण राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करत आहे खोटे नाव आणि खोटी ओळख दाखवणे , फसवणे, महागडी गिफ्ट देणे , रहाणीमान चांगले दाखवणे इ. अनेक माध्यमांतून इतर धर्मीय युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतरण करण्यात येते, त्यानंतर त्यांच्याशी 'निकाह' केला जातो.यामध्ये निष्पाप युवतींचे भयंकर शोषण केले जाते.तरी या अत्यंत गंभीर समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रात तात्काळ जिहाद विरोधी कायदा',व धर्मांतरण विरोधी कायदा'लागू करावा,अशी मागणी हिंदु जनजागृतीच्या वतीने करण्यात आली असुन यासंदर्भात मा. तहसीलदार,नांदुरा यांना निवेदन देण्यात आले.त्याचबरोबर चर्चप्रणीत अनाथालय, कॉन्व्हेंट शाळा  याठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींवर तेथील फादर लैंगिक अत्याचार करण्याची   बेथेल गोस्पेल चारिटेबल ट्रस्ट,मुबंई यांच्या अंतर्गत असलेल्या अनाथालयातील घटना तसेच पुणे येथील हडपसर येथील अल्पवयीन मुलांवर केलेले लैगीक अत्याचार या घटना उघडकीस आल्या आहेत. या संदर्भातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी,राज्यातील संबंधित शाळांची चौकशी करावी याबाबतचे निवेदन सुद्धा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. तहसीलदार साहेब नांदुरा यांना देण्यात आले आहे._
यावेळी,
जितू मोरे - हिंदू जनजागृती समिती
मा.अनिल जांगळे- बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख.
सौ. सरिता ताई बावस्कार (बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख
सौ. प्रज्ञाताई तांदळे- उपशहर प्रमुख,
वेदांत वाणी - युवा ग्रूप
संजू मात्रे - बजरंग दल
सौ. भावनाताई सोनटक्के-  शहर सचिव,
सौ. मंगलाताई सपकाळ, सौ.रुपाली घोपे - सोशल मीडिया प्रमुख, सौ. वनिता गव्हाळे- सहसचिव, सौ. विजया गोरे, भाग्यश्री तांदळे, सपना रूम, स्वाती पारधी, श्रुती गव्हाळे, कु.राणी सावळे , कु. गायत्री डवंगे,  कु. चंचल हेडावू व इतर हिंदुजनजागृतीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post