Hanuman Sena News

बाळासाहेबांची शिवसेना' कडून 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना' आदरांजली अर्पित...







नांदुरा: बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पित करण्यात आली. ज्यांचे नाव उच्चारताच एक ऊर्जा मिळते असे व्यक्तीमत्व म्हणजेच बाळासाहेब' सर्व हिंदुबांधवांच्या मनात आपल्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटविणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर हा स्मृतिदिन त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानात हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे  यांना आदरांजली अर्पित करण्यात येते. 'बाळासाहेबांची शिवसेना' ही बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा तसेच विचारांचा वसा व वारसा  जपणारी संघटना! स्मृतिदिना पित्यर्थ हिंदुहृदय सम्राट यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम  गांधी चौक, नांदुरा येथे अनिल जांगळे, बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख यांच्या वतीने आयोजित  करण्यात आला. सर्वप्रथम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब यांच्या अद्वितीय कार्याचे तसेच त्यांनी धर्म व मराठी माणसाच्या हक्कासाठी-  न्यायासाठी ते न डगमगता निरंतर लढले त्यांच्या या अविस्मरणीय लढ्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दोन माहिलांनी बाळासाहेबांची शिवसेना' या संघटनेत प्रवेश घेतला. व बाळासाहेबांचा हा अद्वितीय वारसा घराघरापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.  कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसेना महिला आघाडी तसेच सर्व शिवसैनिक यांनी सुद्धा बाळासाहेबांनी हाती घेतलेले धर्मकार्य पुढेही निरंतर सुरूच ठेवण्याचा निश्चय केला ,  यावेळी,_
_संतोष भाऊ डिवरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख_
 _सुनील भाऊ जुनारे तालुकाप्रमुख_
 _अनिल भाऊ जांगळे, शिवसेना शहर प्रमुख नांदुरा_
_रमेश भाऊ पाटील, सुरेश भाऊ  पेटकर, सचिन भाऊ पाटील,रविभाऊ इटकळे, सुभाष भाऊ गवळी, पंडित भाऊ बिचारे, राज सुसरे, तुकाराम चिकटे, संतोष फासे,गजानन चिकटे, संदीप पाटील, राजू काटे, पवन भाऊ दुबे, जितेंद्र जुनगडे, संभाजी वसे, संजय मेहसरे, महादेव सपकाळ, देवेंद्र जयस्वाल संजय मात्रे, पवन जांगळे, महेश उंबरकर, विठ्ठल इंगळे, सतीश इंगळे, निलेश पांडव, कृष्णा इंगळे बळीराम इंगळे, प्रशांत भगत, निंबाजी पवार, सचिन चोपडे, सौरभ पाटील, प्रतीक साळुंखे, अमित ठाकूर, कैलास सपकाळ, विशाल हेलगे, विष्णू घनोकार, नामदेवराव जाधव, बाळूभाऊ पाटील, संतोष लाहुडकर, भिका गायकवाड, पवन इंगळे, अनिल वसतकार, रवी मात्रे, हरिभाऊ काटले, मोहन जांगळे, सुरज जांगळे, विश्वकर्मा मुऱ्हेकर, नानाभाऊ खर्चे, जितू मोरे, प्रकाश बावस्कार,_
 _सौ. सरिताताई बावस्कार,महिला आघाडी शहर प्रमुख, नांदुरा_
_सौ. प्रज्ञाताई तांदळे उपशहर प्रमुख._
 _सौ. विजया गोरे, सौ वनिता गव्हाळे, सौ. रुपाली घोपे, सौ.भावना सोनटक्के, सौ. मंगला सपकाळ, सौ. भाग्यश्री तांदळे व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी व हिंदुरुदय सम्राट  बाळासाहेब प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post