Hanuman Sena News

वर्षातून चार वेळा होणार मतदान नोंदणी...





बुलढाणा :  आतापर्यंत एक जानेवारी रोजी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. आता मात्र वर्षातून चार वेळेस मतदान नोंदणी करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकवर आधारित छायाचित्रासह मतदार यादी चा विषय सुरक्षित पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान नोंदणीची प्रकृती या सुरू करण्यात आली आहे. याआधी वर्षातून एकदाच व्हायची नोंदणी मतदान ही नोंदणी एक जानेवारी रोजी किंवा त्याआधी अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची मात्र वर्षातून चार वेळा नोंदणी करता येणार आहे. जानेवारी, एप्रिल, जुलै ,ऑक्टोबर एक तारखेला नोंदणी करतात येईल .त्याआधी अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सर्व पात्र नागरिकांनी लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी.भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांक वर आधारित छायाचित्रासह मतदार यादी चा विषेश संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post