मलकापूर: भाराकाॅचे शहराध्यक्ष मा. नगरसेवक राजू पाटील यांनी दोन वेळेला शहराध्यक्ष पदाची धुरा यशस्वी संभाळीत पक्ष संघटन मजबूत केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी तिसऱ्यांदा त्यांची शहराध्यक्षपदी निवड केली आहे. मा.नगरसेवक राजू पाटील यांना दोन वेळा पक्षश्रेष्ठींनी शहराध्यक्षपदी संधी दिली होती. या कालावधीत त्यांनी शहरांमध्ये पक्ष संघटन मजबूत केले. पहिल्यांदा व दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी निवड केल्याने त्यांनी शहरांमध्ये युवकांमध्ये भाराकाॅची ध्येयधोरणे व पक्षीय संघटन मजबुती करता प्रयत्न केले.तसेच मा. केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य खा.मुकुल वासनिक, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे,आ. राजेश इकडे ,डॉक्टर अरविंद कोलते ,हाजी रशीद खान जमादार, एडवोकेट साहेबराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन 8 नोव्हेंबर रोजी शेगाव येथे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र राजीव पाटील यांना देण्यात आले.यावेळी संजय राठोड, श्याम भाऊ ऊमाळकर, ज्ञानेश्वर पाटील, विजय भाऊ बुरुंगले, लक्ष्मणराव घुमरे, आदी उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यामधील राजू पाटील हे पहिले शहराध्यक्ष आहेत की त्यांची सलग तिसऱ्यांदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली हे उल्लेखनीय आहे.त्यांच्या मलकापूर परिसरातील युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
मा.राजू पाटील यांनी मारली शहराध्यक्ष पदाची हॅट्रिक...
Hanuman Sena News
0
Post a Comment