Hanuman Sena News

शहरामध्ये वाढलेला जलकर कमी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेने कडून, माननीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन...



नांदुरा : 'जल हेच जीवन' या उक्तीप्रमाणेच सर्वांसाठी पाणी हे अनमोल आहे.आज हे पाणी सर्व जनसामान्यांच्या घराघरापर्यंत नळाच्या माध्यमातून  पोहचले आहे. प्रत्येकच जबाबदार नागरिक यासाठी पाणीकर  भरत असतो. पाणी आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी महत्त्वपूर्ण आहे. घराघरापर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या पाण्याचा कर हा सामान्य जनतेला परवडणारा असावा,  पाणी करामध्ये वाढ झाल्यास सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहावर याचा फटका बसेल. नांदुरा नगरपालिकेमधील नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ पूर्णझाल्यामुळे मागील एक वर्षापासून नगर पालिकेवर प्रशासक म्हणून डॉ. आशिष बोबडे हे कार्यरत आहेत.महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना मार्च महिन्यात दि. २८.०३.२०२२ रोजी प्रशासकीय बैठकीमध्ये नांदुरा शहरातील नागरीकांना न.प.द्वारे करण्यात येत असलेल्या पाणी कारामध्ये तसेच नळजोडणीकरिता लागणाच्या अनामत रकमेमध्ये तब्बल ५०%  वाढ करण्यात आली असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नुकतेच दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून समोर आले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. म्हणून बाळासाहेबांची शिवसेना नांदुरा शहर यांच्या कडुन बुधवार दि. ०९/११/२०२२ रोजी माननिय पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा गुलाबरावजी पाटील यांना अवाजवी पाणी कर कमी करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. पुढील नगर पालिकेच्या निवडणुका असुन या अवाजवी व नियमबाह्य दरवाढीचा फटका स्थानिक लोकप्रतिनिधींना बसेल. नगर पालिकेद्वारे चार ते पाच दिवसाआड शहरामध्ये पाणीपुरवठा होत असून ३६५ पैकी १०० दिवस सुद्धा पाणी पुरवठा होत नसतांनाही पूर्वीच्या पाणी करामध्ये जवळपास ५० टक्के दरवाढ जनतेच्या हिताचे नाही. ही सामान्य जनतेवर आर्थीक अन्यायकारक असुन ही दरवाढ रद्द होणे जनतेच्या हितासाठी उचीत आहे. कोरोना महामारीच्या संकटातून सामान्य नागरीक आर्थिक संकटातून सावरत असताना अशा प्रकारचा अवाजवी दरवाढ लादणे हे अत्यंत अन्यायकारक ठरेल. म्हणून  मा. नामदार गुलाबरावजी पाटील  यांना बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख  अनिल भाऊ जांगळे यांच्याकडून  नगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या पाणीकरात व नळजोडणीच्या अनामत रकमेमध्ये करण्यात आलेली अवाजवी व नियमबाह्य दरवाढ त्वरीत कमी करावी अशी सविनय विनंती करण्यात आली._ यावेळी निवेदनावर अनिल भाऊ जांगळे शहर प्रमुख-संतोषभाऊ डिवरे, उपजिल्हा प्रमुख,-सौ सरिताताई बावस्कार,महिला आघाडी  शहर प्रमुख-सौ. प्रज्ञाताई तांदळे, महिला आघाडी उपशहर प्रमुख.-सौ अनुराधाताई नवले शहर संघटक -राजभाऊ सुसरे, युवा सेना शहर प्रमुख-जितेंद्र जुनगडे शहर संघटक-संजय मेहसरे उपशहर प्रमुख-महादेव सपकाळ उपशहर प्रमुख-देवेंद्र जैस्वाल शहर सचिव-शुभम राठी  युवा शहर सचिव-शुभम ढवळे संभाजी वसे विभाग प्रमुख-महेश उंबरकर,कृष्णा इंगळे,बळीराम इंगळे व इतर शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post