Hanuman Sena News

ऑटो झाडावर आदळून चालकाचा मृत्यू...




मलकापूर बुलढाणा मार्गावर नळगंगा फाट्याजवळ कुत्रा रस्त्यात आल्याने ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले सदर ऑटो झाडावर आदळून ऑटो चालकाचा मृत्यू झाला ही घटना 6 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातामध्ये पाच जण किरकोळ जखमी आहे. मोताळा येथील शेख शाहरुख शेख बाबू हा युवक त्याच्या एम एच 28 आर 3114 क्रमांकाच्या ऑटो मध्येप्रवासी घेऊन रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोताळा येथून मलकापूर कडे जात होता.दरम्यान नळगंगा फाट्यावर अचानक रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक शेख शाहरुख याचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऑटो रस्त्यालगतच्या झाडावर धडकला यावेळी ऑटोतील पाच प्रवासी जखमी झाले दरम्यान गंभीर जखमी असलेल्या शेख शाहरुख यास तातडीने नागरिकांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.ही वार्ता मोताळा शहरात पसरतातच सर्वत्र शोककळा पसरली.

Post a Comment

Previous Post Next Post