मुंबई/सातारा - शौर्याचं प्रतिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर अफजल खानच्या थडग्याशेजारील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. पोलीस प्रशासनाने या परिसरात कलम १४४ लागू करून कठोर बंदोबस्त लावला होता. ४ जिल्ह्यातील १५०० पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे शिव-शाहू घराण्याचे वारस आणि माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही ट्विट करुन या निर्णयाचे अभिनंदन केलं आहे. तसेच, त्यांनी आणखी दोन किल्ल्यांची नावेही सूचवली आहेत. संभाजीराजेंनी ट्विट करुन राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ''अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत'', अशी मागणीही संभाजीराजेंनी केली आहे. अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत
संभाजीराजेंच्या या मागणीसंदर्भात राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी नक्कीच यासंदर्भात सरकार सकारात्मक राहिल, असे म्हटले. तसेच, याबाबत संभाजीराजेंशी बोलून घेऊ, मुख्यमंत्रीही संभाजीराजेंशी बोलतील, याशिवास त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचे आभारही सामंत यांनी मानले आहेत.आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे आजच्या दिवशी अफजलखानाचा वध झाला होता 2007 साली कोर्टांन या अफजलखानाच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती 2017 मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अडचणी आल्या आता या सर्व अडचणी दूर झाले असून सातत्याने शिवप्रेमी मागणी होते त्या ठिकाणचा बांधकाम तोडावं शिवप्रेमी वर गुन्हे दाखल झाले परंतु अतिक्रमण हटवला नव्हता हीच सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे कारण त्या ठिकाणचा बांधकाम तोडावं शिवप्रेमी वर गुन्हे दाखल झाले जितेंद्र आव्हाडांनी सांगितले इतिहास बघतांना त्या नजरेने बघा अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधले आता गैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं त्यानंतर ही खबर बांधली इतिहासाचे विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत त्यामुळे लोकांची डोकी फिरवतात असं त्यांनी म्हटलं
Post a Comment