वाई: आखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदीप कोंडे – देशमुख यांच्यावर भादे (ता खंडाळा) गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून देखील अज्ञाताना भिती दाखवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.खंडाळा तालुक्यातील वाघोशी ते मोर्वे रस्त्यावरन कोंडे- देशमुख मोटारीतून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्याला प्रत्युतर म्हणून त्यांच्या सूरक्षा रक्षकाने दोन गोळ्या हवेत झाडल्या. यामष्ये कोणीही जखमी झाले नाही. प्रसाद कोंडे- देशमुख वीर (ता पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबानाथ व मोर्वेचे श्री दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या मोटारीतून लोणंदकडे जात असताना हा प्रकार घडला. प्रत्युत्तर होताच दुचाकीस्वार पळून गेले.
मराठा महासंघाचे युवक प्रसाद कोंडे देशमुखांवर गोळीबार; हल्लेखोर पसार...
Hanuman Sena News
0
Post a Comment