मलकापूर पंतनगर मधील सामाजिक कार्यकर्ते व भाजपा युवा नेते राजकुमार वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आज दि 2/11/2022 बुधवार रोजी मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिले व विविध निधी अंतर्गत पंत नगर मधील नाल्या मंजूर झाल्या असून त्या नाल्याचे बांधकाम संबंधित ठेकेदाराने अर्धवट करून सोडले आहे, त्यामुळे त्याचे सांडपाणी हे नालीतून रस्त्यावर येत आहे.सदर पाणी तुंबून तिथे डबके साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी येत असून डास कीटक यांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण आहे, तसेच बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तरी सात दिवसाच्या आत कारवाई करावी अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल. जनतेच्या आरोग्याची बाधा निर्माण झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील असे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वानखेडे व पंतनगर मधील नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वानखेडे , दिलीप उंबरकर,श्याम भाऊ पासी, बजरंग तायडे, गणेश वानखेडे, शिवा पासी, प्रमोद बांगर, नितीन खंडारे, अजय चंदनशिव, यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मलकापूर पंतनगर मधील नागरिकांचा न. प.मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन...
Hanuman Sena News
0
Post a Comment