नांदुरा: मुले ही देवाघरची फुले' असे म्हटल्या जाते. लहान मुलांना समाजामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मुले म्हणजेच देशाचे भविष्य ! या लहान मुलांवर अतोनात प्रेम करणारे तसेच सर्व मुलांचे लाडके असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच चाचा नेहरू होय. म्हणूच चाचा नेहरुंचा म्हणजेच पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.बालदिनाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी कडुन नांदुरा शहर प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल जांगळे यांच्या मार्गदर्शनात व महिला आघाडी शहर प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. सरिताताई बावस्कार यांच्या अध्यक्षतेत नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, नांदुरा खुर्द येथे शाळेतील सर्व मुलांना शालेय उपयोगी वस्तूंची भेट देऊन बालदिन साजरा करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापिका अलकाताई सावळे यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने महिला आघाडीतील सर्व महिलांचे स्वागत केले. शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महिला आघाडी शहरप्रमुख तथा समाजसेविका सौ. सरिताताई बावस्कार यांनी मुलांना बालदिनाबद्दल माहिती सांगुन विद्यार्थ्यांचे कर्तव्य व शिक्षकांचे महत्व देखील मुलांना पटवून दिले. उपशहर प्रमुख सौ. प्रज्ञाताई तांदळे यांनी प्रश्नमंजुषेचा समावेश करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. शाळेच्या मुख्याध्यापिका कु. अलकाताई सावळे यांनी सर्व शिक्षकवृंदातर्फे महिला आघाडीचे आभार मानले.यावेळी सौ.भावनाताई सोनटक्के -सचिव, सौ. वनिताताई गव्हाळे -सहसचिव,
सौ.रूपालीताई घोपे -सोशल मि. प्रमुख.
सौ. विजयाताई गोरे- सदस्या
सौ.भाग्यश्री ताई तांदळे- सदस्या
सौ. मंगलाताई सपकाळ,
सौ. सरस्वतीताई चीम,
सौ. शितलताई पुंढे,
सौ. मनीषाताई जाधव,
सौ. सुमनताई सरोये,
सौ. स्वातीताई हिंगणकार,
सौ. प्रमिलाताई राठोड व सर्व शिक्षक वृंद व इतर महिला शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment