Hanuman Sena News

पंचायत समिती आरक्षण जिल्ह्यात सभापतीसाठी होणार चुरस...




बुलढाणा:- जवळपास सहा महिन्यापासून मिनी मंत्रालय प्रशासक राज असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीचे ढोल नेमके कधी वाजणार याबाबत साशंकता होती .या पार्श्वभूमीवर 15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तेराही पंचायतसमिती सभापती पदाची आरक्षण सोडत घेण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन ,ओबीसी साठी तीन, आणि सर्वसाधारण साठी पाच ,पंचायत समिती सभापतीचे आरक्षण निघाले आहे .पंचायत समितीवरही सध्या प्रशासक असला तरी आगामी काळात निवडणुका लागल्यास यात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण लवकरच करण्यात येणार असल्याचेही चर्चा प्रशासकीय वर्तुळात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून होती. त्या पार्श्वभूमीवर अखेर 15 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात हे आरक्षण निघाले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी डॉक्टर एच पी तूम्मोड ,अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत ,(निवडणूक) जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, पवार प्रामुख्याने उपस्थित होते. आरक्षण सोडती साठीची पूर्ण तयारी करण्यात आली होती. प्रत्यक्षात नियमानुसार चक्राकार पद्धतीने हे आरक्षण या बैठकीत काढण्यात आले .त्यात कोठेही टाय न  आल्याने ईश्वर चिट्ठीने आरक्षण काढण्याची गरज भासली नाही. पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीला अनेक जण लागले आहेत. बुलढाणा :-अनुसूचित जाती ,नांदुरा :-अनुसूचित जाती महिला ,मोताळा:- अनुसूचित जाती, चिखली:- अनुसूचित जमाती महिला, खामगाव:- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मेहकर:- नागरिकांचा मागास प्रवर्ग शेगाव:- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ,देऊळगाव:- राजा सर्वसाधारण महिला ,लोणार:- सर्वसाधारण महिला सिंदखेड राजा :- सर्वसाधारण ,मलकापूर:- सर्वसाधारण ,जळगाव जामोद:- सर्वसाधारण महिला ,संग्रामपूर:- सर्वसाधारण जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ गेला सहा महिन्यापूर्वी संपला आहे. मार्चमध्ये कार्यकाळ संपलेला आहे त्यानंतर गट गणामध्ये वाढ मतदार यादींची प्रसिद्धी आरक्षण सोडती पूर्वचे सर्व कामे आटोपले होते गट व गणात अनुक्रमे 8 आणि 16 ने वाढ करण्यात आली होती. परंतु भाजप सरकारने वाढीव गटानुसार निवडणूक घेण्यास स्थगिती दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक रखडली आहे .परिणामी आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कधी होईल असा प्रश्न आहे चाणाक्ष राजकारणी मात्र कामाला लागले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post