खामगाव: कुशल हिंदू संघटक, थोर स्वातंत्र्यसेनानी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान खामगाव (बुलडाणा) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने “जाहीर निषेध सभेचे” आयोजन करण्यात आले होते.यावेळी सदर सभेस श्री चैनसुख संचेती यांनी उपस्थित राहून कॉग्रेस नेते खासदार श्री. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातुन जात असून महाराष्ट्रात त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करून समस्त हिंदूचे व महाराष्ट्राच्या प्रत्येक सावरकर प्रेमी चे मन दुखविण्याचे काम कॉंग्रेस खासदार राहुल गांधी करीत आहे, हिंदू संस्कृती बद्दल व देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल कुठलाही इतिहास भूगोल माहिती नस्ताना असे वक्तव्य करणे निंदनीय आहे व त्यांना शोभा देत नाही तसेच त्यांनी स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हिंदू तन मन मेरा हिंदू या कवितेच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीची महिमा काय आहे यावेळी श्री चैनसुख संचेती यांनी प्रचंड समुदायात आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सदर “जाहीर निषेध सभेस”उपस्थित खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह माजी मंत्री आ.डॉ.रणजीत पाटील, डॉ.राजेंद्र फडके, माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे, आ.श्री.प्रकाश पाटील भारसाकळे, आ.श्री.हरीश पिंपळे, आ.श्री.वसंतजी खंडेलवाल, बुलडाणा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.श्री.आकाश फुंडकर, वाशिम भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.राजू पाटील राजे, माजी श्री शिवचंद्र तायडे भाजपा नेते आ.श्री.विजयराज शिंदे, माजी आ.श्री.शशिकांत खेडेकर, श्री.बलदेवराव चोपडे, माजी महापौर श्री.विजय अग्रवाल, प्रदेश प्रवक्ते श्री.शिवराय कुलकर्णी, श्री.दिपक बोरकर, श्री.माधवराव जाधव, मा.जि.प.सदस्य शांताराम दाने, श्री.विनोद वाघ, श्री.सचिन देशमुख ई. प्रमुख नेत्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर” यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा जाहीर निषेध;...
Hanuman Sena News
0
Post a Comment