Hanuman Sena News

रेल्वे स्थानकावर भावना गवळी यांच्यावर घोषणाबाजी झाली; ठाकरे गटांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल...







अकोला :खासदार भावना गवळी यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे ही तक्रार केली असल्याचे समजतेय. खासदार विनायक राऊत आणि बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे काल माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली, असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे. त्यामुळं खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गवळी यांनी पोलीस तक्रार केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.घोषणाबाजी करणाऱ्यांच्या मुलीबद्दल पत्नीबद्दल कोणी अशा घोषणा दिल्या असत्या, व्यक्तव्य केलं असतं, हीन दर्जाची वागणूक दिली असती. घाणेरडे बोलले असते,तर त्यांना चालले असते का? काल अकोला रेल्वे स्थानकावर घडलेला प्रकार म्हणजे त्यांची कृती पाहली असती तर अत्यंत तुच्छ कृती होती, असा आरोप भावना गवळी यांनी केला आहे. जर अशा प्रकारे कृती त्यांच्या बहिणी आणि पत्नीबद्दल घोषणा दिली असती, ते सर्व त्या ठिकाणी पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळी यांनी उपस्थित केला असून या संदर्भात तक्रार लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली आहे. दरम्यान त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे तसेच त्यांची तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी ही खासदार गवळी यांनी केली आहे.बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत मंगळवारी रात्री आमने-सामने आले होते. विदर्भ एक्सप्रेसने काल रात्री अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख हे उपस्थित होते. या दरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ पाहायला मिळाला तसेच रेल्वेत बसलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासमोर 50 खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर शिवसेना महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कराळेसह आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अकोला स्टेशनवर खासदार भावना गवळी या अकोल्याहून मुंबईला जाताना विनायक रवताना स्टेशनवर सोडण्यात आलेल्या शिवसैनिकांनी गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या त्यांची पडसाद आज जिल्ह्यात म्हटले भावना गवळी यांनी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केल्यावर आज वाशिम जिल्ह्यातील शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांचं इतर पदाधिकारी यांनी स्थानिक पाटील चौकात भावना गवळी यांच्या समर्थनार्थ व विनायक राऊत यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत निषेध केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post