बुलढाणा : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावेळी थेट सरपंच पदासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे .आतापासूनच गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे .सरपंच पदाचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच इच्छुक नेते कामाला लागले आहेत. पूर्वी पाच वर्षात अडीच -अडीच वर्षाचा फिफ्टी-फिफ्टी चा फार्मूला अनेक गावांमध्ये वापरण्यात येत होता. यावेळी मात्र फॉर्मुल्याला तडा जाणार आहे. थेट सरपंच निवडणुकीतून आता योग्य उमेदवाराला गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण पाच वर्षाचा कालावधी मिळणार आहे. पूर्वी गावात राजकारण करणाऱ्या कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळाले नाही ,तर त्या पॅनलला उमेदवार कमी पडत असल्याने बहुमत सिद्ध करणे कठीण होत होते.त्यामुळे पॅनल प्रमुख आपला सरपंच व्हावा यासाठी फिफ्टी-फिफ्टी चा फार्मूला वापरत होते. या फार्मूल्यामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवाराला अडीच-अडीच वर्षासाठी सरपंच पद मिळायचे परंतु यातही आधी माझ्या पॅनलचा सरपंच नंतर तुझ्या पॅनलचा सरपंच असे वाद होत होते. गावामध्ये निवडणुकीसाठी काही जुने राजकारणी तर काही युवा चेहरा राजकारणात उतरत असल्याची दिसून येत आहे. मात्र मतदार राजा चा कौल कोणाला हे चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. थेट सरपंच निवडणूक होत असल्याने जातीपातीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात विकास कामा ऐवजी जातीपातीचे राजकारण बहुतांश गावामध्ये केले जाते. पूर्वी निवडुन आलेल्या सदस्य मधून सरपंच पदाची निवड होत होती .त्यामुळे आपल्या पॅनलचा सरपंच व्हावा आणि आपल्या पॅनल मधला सदस्य दुसऱ्या पॅनल मध्ये जाऊ नये यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना गावापासून दूर ग्रामपंचायत अंतरावर ठेवले जात होते. मात्र थेट सरपंच निवडणूक सरपंच निवडीने सदस्याची पळवा पळवी बंद झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागातील राजकारण तापले सरपंचाच्या थेट निवडणुकीने राजकीय समीकरणे बदलणार...
Hanuman Sena News
0
Post a Comment