पहिल्याच दिवशी खामगाव जिल्ह्यामध्ये विक्रमी 5000 हितचिंतक नोंदणी
खामगाव : विश्व हिंदू परिषद 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात हिंतचिंतक अभियान राबवणार असून विदर्भात संपूर्ण 32 जिल्ह्यात 3 लाख हितचिंतक नोंदणी करणार आहे. हिंदू धर्म, संस्कृती संरक्षण आणि संवर्धना साठी स्थापित हिंदूचे विश्वव्यापी संघटन म्हणून विश्व हिंदू परिषद परिचित आहे. धर्मांतरण, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण तसेच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेवाकार्य करण्यात विश्व हिंदू परिषद अग्रेसर आहे. आज पासून प्रारंभ होणार्या हितचिंतक अभियानात संपूर्ण विदर्भातील गावांमध्ये विहिंप, बजरंग दल, दुर्गा वाहिनी चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन 20/- नोंदणी शुल्क घेऊन हितचिंतक नोंदणी करीत आहे, या अभियानात प्रांतातील साधू- संत, गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, मठ मंदिरांचे विश्वस्त, विविध जाती-संप्रदायचे प्रमुख यांना हितचिंतक( सदस्य) करण्यात येणार असून दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती द्वारे 50 हजार महिलांना सदस्य करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. या हितचिंतक अभियान निमित्त विहिंप चे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंगजीराजे,विहिंप प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे यांचा प्रवास झाला असून हितचिंतक अभियान निमित्त बैठकी, कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले आहेत. विदर्भातील 12500 गावात विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक बनवण्याचे लक्ष असून गोंदिया, खामगाव, यवतमाळ येथील गावांमध्ये शत प्रतिशत हितचिंतक बनवण्यात येणार आहे .जास्तीत जास्त संख्येने या हितचिंतक अभियानात सहभागी होऊन विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक होण्याचे आवाहन बजरंग दल प्रांत संयोजक ऍड.अमोलजी अंधारे यांनी केले आहे.
आपल्या मलकापुर शहरात हिंतचितक अभियान शुरू झाले आहेत सर्व हिन्दू बंधु भगिनी यांनी विश्व हिन्दू परिषद सभासद व्हावे असे आव्हान मलकापुर प्रखंड पालक व विश्व हिन्दू परिषद जिल्हा सहमंत्री श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
Post a Comment