Hanuman Sena News

तुर पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल...









काही दिवसापासून तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे बुलढाणा तालुक्यातील शेतकरी हतबल झालेले दिसून येत आहे शेंगांवर असलेले तूर पिक नष्ट होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वातावरणामुळे किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकऱ्यांच्या चिंतेची वाढ झाली आहे. तसेच कळ्या व फुले लागल्यापासून तुरीच्या पिकावर अळ्या दिसून येत आहेत. कळ्या व फुलांवर असलेल्या तुरीच्या पिकांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने शेतकरी वर्ग महागड्या किमतीच्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहे.तरी अळ्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसल्याचे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे आधीच परिसरात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच आता तुरीचे उत्पादनही घटत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post