जिल्ह्यात मुदत संपलेल्या 279 ग्रामपंचायत मध्ये 28 नोव्हेंबर पासून निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात होत आहे सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उमेदवार देताना कसरत होणार आहे जिल्ह्यातील 870 पैकी 279 ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे त्यानुसार 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय या निवडणुकीपासून लागू होणार असल्याने गावागावात चुरस वाढली आहे थेट जनतेतून सरपंच बरोबरच सदस्य निवडून आणण्यासाठी पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत ग्रामपंचायत निवडणूक पॅनलच्या माध्यमातून लढवण्यात येते थेट जनतेतून सरपंच निवडून आला तरी विकास कामे करण्यासाठी तसेच विविध ठराव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये बहुमत असणे आवश्यक आहे त्यामुळे सदस्य पदासाठी चांगले उमेदवार शोधून पॅनल तयार करण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी सध्या व्यस्त आहे निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन पत्र दाखल करणे 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, नामनिर्देशनपत्र छाननी 5 डिसेंबर, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्हाचे वाटप 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर, मतदान 18 डिसेंबर सकाळी साडेसात 7:30ते सायं5:30 वाजेपर्यंत, मतमोजणी 20 डिसेंबर
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आजपासून निवडणुकीची रणधुमाळी गावांमध्ये...
Hanuman Sena News
0
Post a Comment