दोन लाखाचा दंड मानवाधिकार आयोगाचा आदेश
लोणार : मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा घातपात झाल्याची तक्रार पित्याने केल्यानंतर त्याची दखल न घेणे तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे ठाणेदार प्रदीप खंडू ठाकूर हेड कॉन्स्टेबल गजानन धोंडगे यांनी तक्रार करण्यास दोन लाख रुपये भरपाई द्यावी दोघांचीही खातेनिहाय चौकशी करावी असा आदेश राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष के के तातेड यांनी दिला. त्यानुसार ही कारवाई गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी करण्याचा आदेश आयोगाचे सचिव रवींद्र शिसवे यांनी दहा नोव्हेंबरला दिला आहे. लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अभिमन्यू श्रीराम जाधव यांनी 5 मार्च 2022 रोजी लोणार ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा पवन (22) याचा अपघाती मृत्यू नसून घातपात झाल्याचे नमूद केले होते. 1 मार्चला पवन हा चिंचोली सांगळे येथीलच मुकेश पांडुरंग जाधव यांच्यासोबत बाहेर गेला होता. कुंडलस येथील दत्ता नामदेव इफाडे हा सुद्धा सोबत होता. 2 मार्चला पवनचा मृत्यू झाल्यानंतर ते दोघेही उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने चौकशीची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी ती चौकशीत ठेवली पुढे कारवाई न झाल्याने अर्जदाराने लोणार येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली. मानव अधिकार आयोगाकडेही धाव घेतली.अॅड. अशोक राऊत यांनी फिर्यादीची बाजू न्यायालयात मांडताना पोलिसांकडून झालेली हलगर्जी निदर्शनास आणून दिली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी कलम 156 अंतर्गत चौकशी करून पुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी 25 जून 2022 रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला .त्याचवेळी मानव अधिकार आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान मेहकरचे एस डी पी ओ विलास यामावार यांचा चौकशीचा अहवाल सादर झाला .त्याकडे लोणारचे ठाणेदार ठाकूर हेड कॉन्स्टेबल धोंडगे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद केले दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष रवींद्र तातेड यांनी उपरोक्त आदेश दिला आहे. या प्रकरणात ठाणेदार ठाकूर हेड कॉन्स्टेबल गजानन धोंडगे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश ही देण्यात आलेले आहेत सोबतच जबाबदारी निश्चित करून तक्रारदारास कोणीही रक्कम द्यावी हे निश्चित केले जाईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Post a Comment