हिंगोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हिंगोलीत सोमवारी गुरुकृपा हॉटेलचे चालक बाबुराव हराळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तत्पूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ 'फेंटा' नहीं है...सम्मान है महाराष्ट्र का, और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा...कभी झुकने नहीं दूंगा... असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी यांच्या सत्कारानंतर राहुल गांधींनी फुले - शाहू- आंबेडकर यांचे विचारच देशाला वाचवू शकतात असे उद्गार काढले. माळी यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर गांधी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मेनीफेस्टोमध्ये या दोन प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले.राहुल गांधींनी हिंगोलीत आज चहा घेतला. ''बहु दिनसे कितनी बढीया चाय नही मिली, आज चाय पिके बहुत अच्छा लगा.'' असे म्हणत त्यांनी हाॅटेलचालकाची स्तुती करीत त्यांना धन्यवादही दिले.यावेळी त्यांनी विधिज्ञांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ऋतुजा गडदे या विद्यार्थिनीची संवाद साधला. उच्च शिक्षण घेऊन काय व्हावे वाटेल असा प्रश्न त्यांनी ऋतुजाला विचारला. यावेळी तिने क्षणाचाही ही विलंब न लावता मोठा अधिकारी व्हायचे आहे, असे सांगितले. राजकारणात यायचे नाही का? असा प्रश्न विचारून खासदार राहुल गांधी यांनी तिची फिरकी घेतली. त्यानंतर याच ठिकाणी असलेल्या हॉटेल गुरुकृपा येथे येऊन पुन्हा चहाचा आस्वाद घेतला खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत झाले त्यानंतर शहरातील पार्वती टॉवर्स येथे त्यांनी अचानक भेट दिली त्यावेळी त्यांनी एडवोकेट सुरेश गडदे यांच्याशी संवाद साधला यावेळी एडवोकेट मनीषा गडदे, विपिन अर्धापूरकर, सचिन पोले, दीपक लेपुढे,कानबाराव म्हस्के,बालाजी जगताप, गुणाराव फुले, काशिनाथ दिंडे, कृष्णा डिजिटल चे गंगाधर लोंढे, संतोष लोंढे ,बाबुराव हराळे, आदींची उपस्थिती होती.
फुले पगडी घालताच राहुल गांधीचे वक्तव्य " फेटा नही महाराष्ट्र का सन्मान है झुकने नही दूँगा " ...
Hanuman Sena News
0
Post a Comment