Hanuman Sena News

गायरान अतिक्रमणधारकांच्या हक्कासाठी समता संघटनेचे आझाद मैदान मुंबई येथे उपोषण...

विशेष प्रतिनिधी

      उच्च न्यायालयाच्या निर्देशाने सरकारने प्रशासनाला गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले असून प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या आदेशास  सरकारने स्वतःहून न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून भूमिहीन ,शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्या ताब्यातील गायरान जमिनी निष्कासित करण्याच्या कारवाईपासून स्थगीती द्यावी व वर्षानुवर्षापासून भुमीहीनाच्या ताब्यात असलेल्या या जमिनी नियमानुकुल करण्याचा शासन निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्या सोबत जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असलेल्या वनदावे तात्काळ मंजूर करून पट्टे वाटप करावे व बहुसंख्येने भूमिहीन शेतमजूर असलेल्या वर्गासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या मागण्यांकरिता  समतासंघटने कडून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणकरित आहे . यावेळी समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमरपाल वाघमारे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शेकडो गायरान अतिक्रमण धारक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post