Hanuman Sena News

मलकापूर दामिनी पथक ॲक्शन मोडवर चार चिडीमारांना समज...




मलकापूर: स्थानिक पोलीस विभागाचे दामिनी पथक ॲक्शन मोडवर आले आहे. या पथकाने शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी रोड रोमिओ चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई पोलीस नुसार कारवाई केली. सध्या समज देण्यात आली नंतर सापडल्यास जेलची हवा हा फंडा पोलिसांचा असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पोलीस विभागाच्या वतीने दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या माध्यमातून शहर व तालुक्यातील रोड रोमिओ व चिडीमारांना निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे. दामिनी पथकाच्या प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक स्मिता म्हसाये यांच्या नेतृत्वात अंमलदार सविता मोरे, अदिती हुशारे ,अंमलदार मंगेश सनगाडे, आनंद माने यांच्या पथकाने शुक्रवारी मलकापुरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया केल्या, बस स्थानक ,पंचमुखी हनुमान मंदिर, व जनता कला वाणिज्य महाविद्यालय अशा वेगवेगळ्या परिसरात चार रोड रोमियोंना ताब्यात घेण्यात आले. सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस नुसार कारवाई करून समज देत सोडण्यात आले. दरम्यान अलीकडच्या काळात सर्वत्र तरुण व तरुणीशी निगडित विचित्र घटना घडल्यानंतर मलकापुरात खबरदारी म्हणून पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post