बुलढाणा – एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. ५० रेडे पुन्हा गुवाहाटीला चाललेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत हे गल्लीमध्ये मोकाट फिरणाऱ्या बोकडासारखे आहेत. अशी घणाघाती टीका संजय गायकवाड यांनी केली.संजय राऊत म्हणाले, ५० रेडे परत चाललेत गुवाहाटीला. जाऊन या. काय हवंय, ते दर्शन करून या. पण, सुदर्शन चक्र आमच्याकडं आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात सुदर्शन चक्र फिरतो आहे. या सुदर्शन चक्रानं या ५० रेड्यांचा राजकीयदृष्ट्या नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.यावर प्रत्त्युतर देताना संजय गायकवाड म्हणाले, आम्ही काही हिंदुत्व सोडलेलं नाही. पण, तुम्ही अधर्म केला. या सुदर्शनामुळं तुमचा राजकीय नायनाट होईल. ही भविष्यवाणी मी याठिकाणी करतो. आम्हाला रेडे रेडे म्हणता. तुमचे औकात गावतल्या फिरणाऱ्या बोकडासारखी आहे. गावात एखादा मोकाट बोकड सोडलेला असतो. त्याला कोणी कापतही नाही. ज्या बोकडाला कुणी स्पर्श करत नाही, अशा बोकडाची औदाल असल्याची जहरी टीका संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केली.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे सर्व आमदार हे येत्या २६-२७ नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे सर्व आमदार-मंत्री गुवाहाटी जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार हा अद्याप झालेला नाही.
आम्ही हिंदुत्वाचे वेद म्हणणारे रेडेच, संजय राऊत यांना प्रत्युत्तर... संजय गायकवाड
Hanuman Sena News
0
Post a Comment