मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्मिळ योग आज घडून आलेला बघायला मिळाला. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आज एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची आठवण काढली. रामदास आठवले यांच्यासोबत एकत्र आलो होतो, आता प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आपली एकाच मंचावर भेट झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.“काही वर्षांपूर्वी कलिना येथे असाच कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सोबत रामदास आठवले होते. त्यावेळेला ते मला उद्देशून उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक नातू आहेत, असं म्हटलं होतं. तेव्हा मी त्याला एकत्र ये असं म्हटलं होतं”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.“आज मला आनंद आणि अभिमान आहे, असं काही नाही की प्रकाशजी आणि माझी ओळख नाही. आम्ही एकमेकांना ओळखतो. मध्यंतरी आमच्या भेटीही झाल्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.“त्यांना भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा, त्याला मिनिटांचं गणित लागत नाही. आम्ही आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमचं दोघांचं एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत”, असं ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार ...
Hanuman Sena News
0
Post a Comment