समाजसेवा करायची असेल तर त्याला राजकारणाची जोड असावी लागते,बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच धर्म - समाज हितासाठी झटणारा पक्ष! या पक्षाने आपल्या जनहीतोपयोगी कार्याच्या माध्यमातून गरुडझेप घेतलेली आपल्याला दिसून येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात धर्मप्रेमी, समाजप्रेमी, सेवाभावीवृत्ती असलेल्या व्यक्तीमत्वांचा प्रवेश होऊन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होताना आपल्याला दिसत आहेत.महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच पालक मंत्री बुलढाणा जिल्हा मा. नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते बुधवार दि. ०९/११/२०२२ रोजी महिला आघाडीमधे धर्मप्रेमी तसेच सेवाभावी वृत्ती असलेल्या निरनिराळ्या प्रभागातील एकूण पाच महिलांनी प्रवेश घेऊन निरनिराळे पदभार घेतला व त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीची कार्यकारणी घोषित करण्यात आली सर्व नवनियुक्त महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 'बाळासाहेबांची शिवसेना' हा पक्ष समाजहितासाठी झटत आहे त्याचप्रमाणे शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडीसुद्धा पक्षाचा वारसा पुढे नेवून स्त्रीउद्धरासाठी झटेल असे आश्वासन महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ. सरिताताई बावस्कार व उपशहर प्रमुख सौ. प्रज्ञाताई तांदळे यांच्या वतीने देण्यात आले.नवनियुक्त महिलांची यादी पुढीलप्रमाणे.
_सौ. अनुराधा मधुकर नवले -_ शहर संघटक.
_सौ. भावना किशोर सोनटक्के-_ सचिव
_सौ. वनिता नितीन गव्हाळे-_ सहसचिव
_सौ. रुपाली अमोल घोपे -_ सोशल मीडिया प्रमुख
_सौ. विजया प्रमोद गोरे -_ सदस्या.
_सौ. भाग्यश्री श्रीकांत तांदळे -_ सदस्या.
Post a Comment