Hanuman Sena News

अवैध धंद्यांना जबाबदार असलेल्या ठाणेदारावरील कारवाई गुलदस्त्यात...


एसपीच्या पथकाचे अवैध धंद्यावर शिक्कामोर्तब अनेक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वर्षभरात 135 कारवायांची नोंदी


खामगाव : कोणतीही अवैध धंदे चालू देणार नाही ही प्रतिमा घेऊन खामगावात वर्षभरापूर्वी दाखल झालेले अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण एस दत्त यांच्या पथकाने घाटाखालील सहा तालुक्यासह घाटावरील अनेक ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाया केल्या. वर्षभरात कारवायाची संख्या 135 पेक्षाही अधिक आहे त्यावेळी संबंधित ठाणेदार किंवा त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कोणती कारवाई झाली ही बाब अद्यापही पुढे आलेली नाही याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातील काहींनी विचारणा केली असता याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अप्पर पोलीस अध्यक्ष श्रावण एस दत्त खामगावात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या कारवाईचा धसका अवैध धंदेवाल्यांनी घेतला होता गुटखा, मटका, धान्याचा काळाबाजार, क्रिकेट, सट्टा, वाळू तस्करी, यासारख्या अवैध धंदे चालवणाऱ्यांनी त्यांना रुजू होण्यापासून रोखण्यासाठी ही प्रयत्न केल्याची चर्चा झाली होती. अप्पर पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांची कार्यपद्धती समजून सांगितली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईसाठी पथक गठन करण्याचाही मुद्दा होता त्या पथकाने कोणत्याही ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई केल्यास त्यासाठी संबंधित ठाणेदार, बीट जमदार यांना जबाबदार धरून पुढील कारवाई केली जाईल असे बजावले होते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने गेल्या वर्षभरात अवैध धंद्यावर तब्बल 135 कारवाया केल्या त्याप्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हेही दाखल केलेले आहेत सर्वाधिक कारवाया घाटाखालील सहा तालुक्यातील ठाण्याच्या हद्दीत झालेले आहेत मात्र ती कारवाई किती जणांवर झाली याबाबत माहिती अद्याप पुढे आलेली नाही. विशेष म्हणजे कारवाईदरम्यान पथकानेही काही ठिकाणी केलेल्या घोळामुळे शंका उपस्थित झाल्या होत्या. त्यामुळे पथकच ऑक्टोबरच्या सुरुवातीला रद्द करण्यात आले त्यानंतर नवीन पथकाची गठनही लवकरच केले जाईल असेही अप्पर पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यांनी काही दिवसापूर्वी संबंधितांना नोटीस बजावल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ठाणेदाराचे स्पष्टीकरण आणि त्यानुसार झालेली कारवाई ही बाब ते 6 नोव्हेंबर रोजी रुजू झाल्यानंतरच पुढे येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post