Hanuman Sena News

सोयाबीनचे भाव 6 हजारांवर स्थिर, शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत...



बुलढाणा : सध्या सोयाबीनला बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे मात्र गत आठवड्यापासून भाव 6 हजारांवर स्थिर आहेत आगामी काही दिवसात भाव वाढण्याची शक्यता वर्तुली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेत आठवडाभरापासून सोयाबीनची आवक घटली आहे. यंदा जुनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती परंतु सोयाबीन व कपाशीच्या जेव्हा काढणीला आले आणि जिल्ह्यात अतिवृष्टीने धुमाकुळ घातला. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेले पिके वाया गेली होती यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते .झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. दरम्यान या अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी सोंगनी केले.सुरुवातीला सोयाबीनला 5 हजार रुपयांचा भाव होता. बहुतांश शेतकऱ्यांनी खराब सोयाबीनची विक्री केली. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली होती .परंतु मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर वाढत आहेत हे दर आणखी वाढतील या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवली आहे. परिणामी सध्या सोयाबीनची आवक यामुळे घटली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post