राज्य शासनाने सर्वच विभागातील सर्वच संवर्गातील रिक्त पदे भरण्याची अन् आवश्यक असलेली वाढीव पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रीया गतिमान केली असून, त्यानुसार माहिती मागविण्यासह सुरुवात केली आहे. त्याअंतर्गतच आता राज्यातील ४ हजार १२२ तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार आहे. त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील ०६ विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहितीही मागविली आहे. त्यामुळे पुढील वर्षी तलाठ्यांचीही मेगा भरती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.राज्य शासनाने लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेऊन त्याबाबत एमपीएसीला माहिती सादर करण्यासाठी सर्वच विभागांना १५ डिसेंबरपर्यंत माहिती मागविली आहे. ही माहिती संग्रही करण्यास सुरुवात होते न होते तोच राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी २९ नोव्हेंबरला स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील ३१ डिसेंबर २०२२ रोजी रिक्त होणारी १०१२ पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे, असे एकूण ४१२२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांत आरक्षण निहाय आणि जिल्हा निहाय तपशीलाची मागणी केली आहे. राज्य शासाने १४ विभागांची रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत. आता या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये सर्वाधिक 1035 तर अमरावती विभागात 183 जागा येत्या 15 दिवसांमध्ये माहिती देणे आहे बंधनकारक सर्वच माहिती विहित नमुन्यात विवरण पात्रात भरून जिल्हा निहाय प्रत्येक जिल्हाधिकार्यांकडून प्राप्त करून 15 दिवसात सादर करण्याचे आदेशही दिले आहे त्यामुळे आता सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकार्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांचे पदेही रिक्त आहेत त्यामुळे ही पदे भरल्यास शासनाने काम गतिमान होऊन शेतकरी तसेच नागरिकांचे प्रश्नहीयामुळे सुटणार आहेत या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे औरंगाबाद विभागात आहेत 847 जागा नाशिक 1035 औरंगाबाद 847 कोकण विभाग 731 नागपूर 580 अमरावती 183 पुणे 746 एकूण 4122 नाशिक विभागातील जिल्हा निहाय जागा जिल्हा रिक्त पदे नाशिक 252 धुळे 233 नंदुरबार 40 जळगाव १९८ अहमदनगर ३१२ एकूण 1035 महसूल उपयुक्त असतील समन्वयक अधिकारी ही माहिती प्रशासनाला पाठविण्यासाठी विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्ततांना समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे सर्व जिल्ह्यांची माहिती व्यवस्थित तपासून खास दुतावासाद्वारे शासनास पाठवण्याचेही आदेश दिले आहेत त्यामुळे आता या अधिकाऱ्यांना कामाला लागावे लागणार आहे
राज्यामध्ये 4122 तलाठी पदे भरणार: मंत्रिमंडळाचीही मान्यता; 6 विभागांकडून मागवल्या रिक्त जागा...
Hanuman Sena News
0
Post a Comment