कर्नाटकातील शालेय संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांचे एकमत झालेले नाही. यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडून केली जाणार आहे. यातच हिजाबवरून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.'मी जेव्हा बोलतो, की एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला या देशाची पंतप्रधान व्हावी, तेव्हा अनेकांच्या डोक्यात आणि पोटात दुखायला लागते. मी असे का म्हणून नेय? हे माझे स्वप्न आहे. यात चूक काय? पण तुम्ही म्हणता, की कुणीही हिजाब परिधान करू नये. मग काय घालायला हवे? बिकनी? आपल्याकडे तीही घालण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मुलीने हिजाब परिधान करू नये आणि मी दाढी कापावी, अशी आपली इच्छा का?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.आम्ही मुलींवर दबाव टाकतो का ?ओवेसी म्हणाले, मुस्लीम मुलीने हिजाब घातला, तर तिची बुद्धीमत्ता कमी आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही आमच्या लहान मुलींना हिजाब घालण्याचा दबाव टाकतो का? आम्ही खरंच मुलींना बळजबरी करतो का? आमच्यावर आरोप केला जातो, की आम्ही मुलींवर दबाव टाकतो. खरे तर, आजकाल कोण कुणाला घाबरतो? यावेळी त्यांनी हिजाबची तुलना पुन्हा एकदा हिंदू, शिख आणि ख्रिश्चन प्रतिकांशी केली.ते म्हणाले, जर हिंदू, शिख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिकांसह प्रवेश दिला जातो, तर मग मुस्लिमांनाच का रोखले जाते. असे झाले, तर ते लोक मुस्लीम समाजाच्या बाबतीत काय विचार करतील. त्यांना तर असाच मेसेज जाईल, की मुस्लीम आपल्या पेक्षा खालच्या पातळीचे आहेत. यावर भाजप नेत्ये सीटी रवी म्हणाले, ओवेसी हे अतिरेकाचे समर्थन करतात, हे भारतात चालणार नाही.सीटी रवी म्हणाले, 'मला ओवेसींना विचारायचे आहे की तुम्ही कुराणाच्या नावावर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तालिबानला पाठिंबा देतात का, अल्लाह च्या नावाने दहशतवाद वाढवणाऱ्या लादेनचं तुम्ही समर्थन करता का, एवढेच नाही तर बहुतांश लोक अल्लाहच्या नावाने दहशतवाद वाढवत आहेत. पण भारतात याला परवानगी दिली जाणार नाही.
एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला PM व्हावी ... ओवेसी
Hanuman Sena News
0
Post a Comment