बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीकडून कर्जदाराला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कर्जाचा हप्ते चुकल्याच्या कारणावरून कायदा हातात घेत अतिषय अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने फायनान्स कंपन्यांवर कोणाचाच अंकूश नसल्याचे दिसून येत आहे. फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून तीन दिवस डांबून ठेवत एका कर्जदारावर अमानुष अत्याचार केला.मिळालेल्या माहितीनुसार, फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून तीन दिवस डांबून ठेवत एका कर्जदारावर अमानुष अत्याचार केला. एवढेच नाही तर जळत्या सिगरेटचे चटके सुद्धा फिर्यादीला देण्यात आले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव मध्ये अशपाक खान नामक 32 वर्षीय युवकाने बोलेरो वाहनावर कर्ज घेतले होते, मात्र व्यवसाय मंदीत आल्यामुळे या युवकाने हे वाहन अकोला येथील एकास रीतसर नोटरी करून विक्री केली होती.मात्र सदर खरेदीदाराने या कर्ज देणाऱ्या कॅपिटल फायनान्स चे हप्ते न भरल्यामुळे सदर फायनान्सच्या वसुली करणाऱ्या काही लोकांनी अशपाक खान यांच्या फिर्यादीवरून शेगाव पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फायनान्स कंपन्यांची दादागिरी हप्ते चुकले म्हणून तीन दिवस डांबुन ठेवत मारहाण...
Hanuman Sena News
0
Post a Comment