मलकापूर: आ प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी ह्यांच्या वाढदिवस निमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजप जैन प्रकोष्ठ तर्फे स्थानिक भाजप कार्यालय येथे 2 ऑक्टोबर रोजी मोफत रोगनिदन शिबीर संपन्न झाले.. शिबिराच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला आ लोकनेते श्री चैनसूखजी संचेती ह्यांच्या हस्ते मालयार्पण करण्यात आले.. ह्या शिबिरात मोफत नेत्र, दंत व रक्तगट तपासणी करण्यात आली.. शिबिरात अंदाजे 150 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.. आ चेनूभाऊनी आपले मनोगत व्यक्त करतांना ह्या शिबिराला आपल्या शुभेच्छा दिल्या.. भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश सह सचिव डॉ योगेश पटणी ह्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले..ह्या शिबिरासाठी नेत्र तपासणी साठी श्री मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा, दंत तपासणी साठी डॉ वेदांती पाटील व रक्तगट तपासणी साठी डॉ भारती पाटील ह्यांची सेवा लाभली
ह्या कार्यक्रमासाठी श्री चैनसूखजी संचेती, श्री मोहनजीं शर्मा, श्री मिलिंदजी डवले, श्री संजय काजळे, श्री केदारभाऊ एकडे, श्री शंकरराव पाटील, डॉ योगेश पटणी, श्री शैलेंद्र राजपूत सर, श्री संतोष बोंबटकर, श्री विजय डागा, श्री शरद मांडविया, भूषण भीमजियानी, डॉ नीलिमा झंवर, सौं अश्विनीताई पाटील, सौं भावना मुंदडा, श्याम वानखेडे सर, नितीन भुजबळ सर,विनोद आकोटकर,श्री अमोल टप, श्री नानाभाऊ येशी, देवेन टाक, कुणाल ढोलकर, परीक्षित खर्चे, अमित चौबे, अजय नांदुरकर, अक्षय जामोदे समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Post a Comment