अकोला : अकोला जिल्ह्यात मृत युवकाला जिवंत करुन गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून माडला आहे. बुधवारी सायंकाळी एका युवकाचा अंत्यसंस्कार होत असतानाच तो तिरडीवर उठून बसला होता. मात्र, हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.पातूर तालुक्यातील विवरा गावात ही घटना घडली. मृत झाल्याचा बनाव करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस स्टेशनमध्येच त्याची आरोग्य तपासणी केली असता युवक निरोगी आढळून आला आहे. आता हा प्रकार युवकाच्या कुटुंबीयांनी का केला? याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी 'दिव्य मराठी'ला दिली आहे.विवरा येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत मेसरे याला दातखिळी येण्याचा आजार आहे. उपचारासाठी त्याला कुटुंबीयांनी खामगाव येथील डॉक्टरांकडे नेले होते. प्राथमिक तपासणी व उपचारानंतर डॉक्टरांनी काही चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर युवकाला अकोला येथे उपचारासाठी नेत असल्याचे सोबतींनी सांगितले. मात्र, त्याला अकोला येथे उपचारासाठी न नेता गावात आणण्यात आले बुधवारी सायंकाळी गावामध्ये प्रशांत मृत झाल्याची माहिती पसरली. गावातील सर्व नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तेथे नातेवाईक अंतिम संस्काराची तयारी करत होते. प्रशांतला तिरडीवर ठेवण्यात आले. अंत्ययात्रा पाचशे मीटर अंतरावर गेली असता प्रशांतच्या आईने मुलाला गावातील मांत्रिक दीपक गणेश बोरले यांच्याकडे घेऊन नेण्याचे सांगितले. तेव्हा अंत्ययात्रा अंतिम संस्कारासाठी न नेता महाराजांकडे वळवली. महाराजांच्या मंत्र उपचारानंतर काही कालावधीतच तिरडीवरील मयत प्रशांत मेसरे उठून बसला. यावेळी अंतिम संस्काराला आलेले नातेवाईक आणि गावकरी चकीत झाले. पोलिसांनी सर्व घटनाक्रमांकबाबत माहिती देताना सांगितले की युवकाला त्याच्या आईवडिलांनी दवाखान्यात न नेता सैलानी कडे नेले त्यापूर्वी त्याच्या दवाखान्यात रक्तदाब व इतर वैद्यकीय चाचण्या केल्या त्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या त्यानंतर बुधवारी सायंकाळी युवकाला घरी आणले त्यानंतर त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली तातडीने त्याला घरून हलवले आणि लगेच तिरडी पाचशे मीटर जात नाही तोच त्याच्या आईने महाराजाकडे घेऊन चला असा आग्रह धरला हा सगळाच प्रकार भरावाड असल्याचे प्रथम दर्शनी आढळून येते असे पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी सांगितले त्याचबरोबर गावचे माजी उपसरपंच अमर पजई, सरपंच माणिक देठे हरिभाऊ इंगोले यांनीही या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे सानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे पीएसआय गणेश महाजन पोलीस पाटील भुजंगराव देशमुख आदींनी पीडित मुलगा प्रशांत याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची आरोग्य तपासणी केली तपासणी मध्ये तो निरोगी असल्याचे आढळले मात्र त्याला मानसिक उपचाराची आवश्यकता आहे काय याची चौकशी पोलीस करीत आहे या सर्व प्रकारामुळे विवरा गाव राज्याच्या पटलावर चर्चेत आले आहे या सर्व मंडळींनी हा सर्व प्रकार केला तरी कशासाठी? याचा तपास पोलीस करीत आहे.
अकोल्यात मृत युवकाला जिवंत केल्याचा बनाव गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment