Hanuman Sena News

हनुमान सेना वाघोळा यांच्यातर्फे "आद्यकवी महर्षी वाल्मिक" जयंती साजरी करण्यात आली...



मलकापूर (वाघोळा ): महर्षी वाल्मिकी यांची जयंती अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य "रामायण" महर्षी वाल्मिकी यांनी रचले आहे. वाल्मीक ऋषींनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण सर्वात जुने मानले जाते. वाल्मीक रुषी हे नाव कसे पडले,वाल्मिक जी तपश्चर्येला बसले होते बराच वेळ चाललेल्या या तपस्येमध्ये ते इतके तल्लीन झाले होते की त्यांच्या संपूर्ण शरीराला वाळवी लागली होती. तरीही त्यांनी तपश्चर्यात भंग आनु दिला नाही. जेव्हा तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हाच त्यांनी डोळे उघडले असे म्हटले जाते. ज्या ठिकाणी वाळवी आपले घर बनवते त्याला वाल्मिकी म्हणतात. म्हणून ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले .तसेच वाल्मीक जयंतीचे अवचित साधून आज वाघोळा गावातील हनुमान सेनेचे कार्यकर्त्यांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती सर्व मंदिरांची, गावातील परिसराची, साफसफाई करून एक आगळी वेगळी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गावचे पोलीस पाटील संतोष कांडेलकर व गावचे सरपंच संदीप लष्करे हे उपस्थित होते. तसेच या संपूर्ण जयंती चे नियोजन हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष रोहित कांडेलकर, संपर्कप्रमुख आकाश काहते, गावातील जेष्ठ नागरिक पंडित मोरे, संतोष काहते, शिवचरण गावंडे, शत्रुघ्न गावंडे ,तसेच गावातील युवा शिवम मोरे ,नितीन मोरे, शुभम चोपडे, तुका मोरे, उमेश घुमरे, तसेच महर्षी वाल्मिकी मित्र मंडळ अध्यक्ष शुभम धाडे व सर्व समाज बांधव व गावकरी मंडळी तसेच हनुमान सेना सदस्य व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post