मुंबई: गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले."गेल्या आठ- दहा दिवसांपासून जो वाद सुरू होता त्या वादावर आज पडता पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वर्षा बंगल्यावर तीन तास चर्चा झाली. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्य निघाली असतील तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असंही आमदार रवी राणा म्हणाले."मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचे दु:खावले असतील तर मी त्यांचीही माफी मागत आहे.देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत, मी त्यांचा आदेश हा सर्वस्वी मानतो.वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेतून वादाला पूर्णविराम मिळाला आहे, असंही रवी राणा म्हणाले."या विषयात काही पडलेले नाही. या भंडणातून विरोधक फायदा घेत आहेत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. सरकार आमचे आहे, राज्याला अडीच वर्ष सरकार होते का नाही असं होते, आता या सरकारने मोठी काम करायला सुरूवात केली आहे. आमचे हे सरकार मजबूत सरकार आहे, यासाठी आम्ही आमचे शब्द पाठिमागे घेत आहे, असंही आमदार रवी राणा म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू वरील आरोप घेतले मागे...
Hanuman Sena News
0
Post a Comment