मलकापूर:नवरात्री उत्सव निमित्त विश्व हिंदू परिषद मातृशक्ती व दुर्गा वाहिनी यांच्या तर्फे डॉ. हेडगेवार सभागृह मलकापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद जी शेंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या आईचे आपल्यावर असंख्य उपकार असतात त्या उपकाराची आपण परतफेड कधीच करू शकत नाही. अशी भारत माता माझी आई आहे. तिचे उपकार आपल्यावर खुप आहेत. याची जाणीव जपून आपण धर्मांतर करू नये. लव जिहाद सारख्या प्रकरणातून दूर राहावे आपल्या अनेक हिंदू मुली लव्ह जिहादला बळी पडल्या गेल्या आहेत. अशा मुलींना आपल्या प्राणापासून मुकावे लागले आहे .असे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख विश्व हिंदू परिषद चे प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे यांनी नव्या पिढीला दिला. नवरात्री उत्सव निमित्त विश्व हिंदू परिषद मातृशक्ती व दुर्गा वहिनी मलकापूर यांच्याद्वारे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार सभागृह मलकापूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे पुढे बोलताना म्हणाले की हिंदू स्त्रियांचा लवजिहाद ला बडी पडू नये. यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने योग्य काळजी घेणे आजच्या काळाची गरज बनली आहे .आता संघटित होऊन लवजिहाद सारख्या संकटाला सामोरे जाऊन प्रत्युत्तर द्यावे लागेल .आणि हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपली संस्कृती वाचवावी लागेल. असे आव्हान विश्व हिंदू परिषद चे प्रांतमंत्री गोविंदजी शेंडे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ पुनम ताई बाहेती या होत्या तर प्रमुख व्यक्ती विश्व हिंदू परिषद प्रांतमंंत्री गोविंदजी शेंडे होते. तसेच विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अश्विन भाई पटेल ,विश्व हिंदू परिषद तालुकाप्रमुख संमती जैन, तालुकाध्यक्ष मायाताई वानखेडे, मातृशक्ती संयोजिका स्नेहा ताई सदावर्ते,भारतीताई वैष्णव, दुर्गा वाहिनी संयोजिका प्रीती ताई फाटे, हे होते यावेळी शहरातून दुर्गा वाहिनीचे पतसंंचालन गोविंद विष्णू महाजन विद्यालयापासून ते चांडक विद्यालयाच्या पर्यंत काढण्यात आले . विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नऊ कन्या पूजन व शस्त्र पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक पूनम ताई बाहेऊ यांनी उपस्थित मातृशक्तीला अबला नाहीतर सबला या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले विश्व हिंदू परिषद चे प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे यांनी दुर्गा वाहिनी व मातृशक्ती यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी शेकडोच्या संख्येने महिला व मुली उपस्थित होत्या
लव्ह जिहादला हिंदू मुलींनी बडी पडू नये विश्व हिंदू परिषद यांचे प्रतिपादन...गोविंद जी शेंडे
Hanuman Sena News
0
Post a Comment