जळगाव: जिल्ह्यातील दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. संघात झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एकनाथ खडसे जळगाव पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाला बसले आहेत. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने खडसेंनी अधिकाऱ्याला चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली आहे.जळगाव जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी खडसे काही तासांपासून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षकांच्या दालनात आंदोलनाला बसले आहेत. एकनाथ खडसे यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे तर दुसरीकडे कायदेशीर बाबीचे कारण पुढे करत पोलीस अधिकारी समजूत घालत आहे तसेच चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे मात्र खडसे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.मी मेलो तरी गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही असेही खडसेंनी ठणकावून पोलिसांना सांगितलेदरम्यान राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप खडसेंनी केला आहे पोलिसांनी रात्री बारा वाजता एकनाथ खडसेंची निवेदन स्वीकारले पण गुन्हा दाखल न केल्याने खडसे रात्री पोलीस स्टेशन बाहेरच झोपले होते
जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा... एकनाथ खडसे
Hanuman Sena News
0
Post a Comment