मलकापूर : दिनांक ३१आक्टोंबर २०२२वार सोमवार भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचा सहभाग घेऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वतंत्र्य भारत देशाचे पहिले ग्रुहमंत्री लोहपुरुष भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त मलकापुर जिल्हा परिषद शाळा वाकोडी येथे साजरी करण्यात आली यावेळी शाळा समिती अध्यक्ष मा.योगेश जी काजळे , मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा चौधरी, अंगणवाडी सेविका सविता ताई हिवाळे, सुनिताताई ठाकुर यांच्या सह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. योगेश काजळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशातील तरुणाच्या मनात रुजवण्याची गरज आहे असे थोर पुरुषांचा आदर्श आपण नेहमीच ठेवला पाहिजे व युवावर्गांनी कुठेही न भरगळता योग्य प्रवाहाच्या दिशेने आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे जीवनात अनेक संकटे येतात त्या संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा या थोर पुरुषांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते असे योगेश काजळे यांनी बोलण्यातून व्यक्त केले यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते
जिल्हा परिषद शाळा वाकोडी येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी...
Hanuman Sena News
0
Post a Comment