Hanuman Sena News

नरवेल येथे स्वयंपाक करतांना कुकरचा स्फोट दोन महिला जखमी...

नरवेल : डाळ शिजवण्यासाठी टाकल्यानंतर चुलीत जाळ लावताना कुकरचा स्फोट झाल्याची घटना मलकापुरातील नरवेल येथे रविवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी मलकापूर येथे पाठवण्यात आले. गावात एका कुटुंबात सावटण्याचा कार्यक्रम असल्याने पाहुण्यांच्या जेवणाची तयारी सुरू होती.त्यासाठी कुकरमध्ये उडीद, हरभरा डाळ टाकून चुलीवर ठेवण्यात आली. सुनीता शांताराम धाडे, लता विकास धाडे या महिला चूल पेटवत होत्या. त्यावेळी अचानक कुकरमध्ये जास्त वाफ जमा झाल्यानंतर ती बाहेर निघाली नाही त्यामुळे कुकरचा वाफेमुळे स्फोट झाला यात दोन्ही महिला भाजल्या डोळ्यांमध्ये डाळीचे कन तसेच गरम वाफ गेल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दोन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Post a Comment

Previous Post Next Post