मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता, येत्या विस्तारात राज्यमंत्र्यांनाही स्थान दिलं जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील नऊ जण आणि भाजपच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. सोबतच शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा होती. भाजपमध्येही प्रमुख नेत्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये या नाराजांना स्थान मिळू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपकडून प्रविण दरेकर, गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळात विस्तारात यांना संधी मिळू शकते? प्रवीण दरेकर, संजय कुटे,
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर ,प्रसाद लाड ,योगेश सागर, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार,महेश लांडगे किंवा राहुल कुल ,निलय नाईक, गोपीचंद पडळकर ,नितेश राणे
राज्याच्या मंत्रिमंडळात याआधी 9 ऑगस्ट रोजी विस्तार झाला त्यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपाकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला या सर्व आमदाराची कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण वीस जणांचे मंत्रिमंडळ सध्या अस्तित्वात आहे पहिल्या मंत्रिमंडळात भाजपाच्या खाली नेत्यांना स्थान मिळाला होता राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण ,अतुल सावे, मंगल प्रभात लोढा इत्यादी आमदारांना मंत्रीपद दिले गेले आहे.
Post a Comment