नागेश सुरंगे
विशेष प्रतिनिधी
मलकापूर: मलकापूर शहरातील एकता ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शाम हिरालाल श्रीवास यांच्या नेतृत्वात दिनांक ७ /१०/२२ रोजी मा. मुख्याधिकारी रमेश बगे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ऑटो स्टॉपची जागा तत्कालीन न.प. अध्यक्ष शामकुमार राठी यांनी नगर परिषद ठराव कं. ३१, दिनांक २०.३.२००६ रोजी शहरातील सर्व अॅटो स्टॉप साठी जागा उपलब्ध करून दिल्या होत्या.
ऑटो स्टॉप क्रमांक २ हा
तहसील चौकातील रेस्ट हाऊसला लागून होता मात्र बाहेरून येणाऱ्या एस टी चा थांबा या ठिकाणी असल्यामुळे तसेच चारही बाजुकडुन वाहनांची वर्दळ असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी तथा ठाणेदार यांनी सवानुमते ऑटो चालकांना ऑटो स्टॉपसाठी बुलढाणा रोडवरील बुलढाणा कडे जाणारा रस्त्याला लागून टो स्टॉप दिला होता. परंतु या स्टॉप क्रमांक २ तहसिल चौक येथील जागेवर काही टपरी धारकांनी दादागीरीने टप-या ठेवून अतिक्रमण केले व व्यवसाय सुरू केला. त्यामुळे चालकांना टो रस्त्यावर लावून व्यवसाय करावा लागतो. बुलढाणा रोडवर असलेल्या ऑटो स्टाफवर काही अतिक्रमधारकांनी अतिक्रम केल्याने ऑटो रिक्षा स्टॉप गहाळ झाला आहे.मलकापूर शहरातील तहसील चौक परिसराती ऑटो स्टॉप असून काही अतिक्रमधारकांनी अतिक्रम करण्यात असल्याने ऑटो चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बन्याचदा पोलीस प्रशासनाच्या दंडालाही सामोरे जावे लागते. या अतिक्रमणामुळे ऑटो चालकांना रस्त्याच्या कडेला परंतु रस्त्याच्या मधोमध नाईलाजाने ऑटो उभा करावा लागतो. त्यामुळे होते.रहदारीचा नागरीकांना त्रास सोसावा लागतो. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा जनसामान्याकडून चर्चा होत आहे.त्यामुळे नगरपरिषद यांच्याकडे लक्ष देणार का? अशा आशयाचे निवेदन पोलीस प्रशासन, नगरपरिषद, तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग आजच्या व आमदार राजेश एकडे यांना दिले असून ऑटो स्टॉपवरील अतिक्रम काढून आम्हाला आमचे स्टॉपची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी ऑटो चालक - मालक उपस्थित होते
Post a Comment