Hanuman Sena News

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील पहिले मंदिर बुलढाण्यात...


बुलढाणा: भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाणा शहरात उभे राहणार आहे त्याची भूमिपूजन काल शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज हे शक्ती भक्तीचे प्रतीक असून लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची जे स्वप्न मी बघितले होते ते आता पूर्ण होत असल्याचा आनंद आहे असे प्रतिपादन संजय गायकवाड यांनी केले. बुलढाणा शहरातील राजमाता चौकात छत्रपती शिवरायांचे हे भव्य मंदिर उभे राहणार आहे. विशेष म्हणजे स्वतः आमदार संजय भाऊ गायकवाड या बांधकामात जातीने लक्ष घालत असून मंदिरात कुठे काय असावे इंटेरियर कसे असावे याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य रयतेसाठी होतं आणि रयतेचा कल्याणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच बुलढाणा येथील कर्तव्यदक्ष आमदार संजू भाऊ गायकवाड आपल्या विधानसभा मतदारसंघात विकासात्मक कामे करत असल्याचे दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post