मलकापूर प्रतिनिधी
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूरचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांच्या नेतृत्वात मलकापूर नगर परिषदेला दि.१२आक्टोंबर २०२२ रोजी दिव्यांग बांधवांसाठी असणारा ५%निधी दिवाळी पुर्वी द्यावा असे निवेदन देण्यात आले होते. ही बातमी न्यूज हनुमान सेना या पोर्टल न्यूज चैनल वर प्रसारित केली होती. त्यावर मलकापूर नगरपरिषदेचे कर्तव्य दक्ष प्रशासक व तहसीलदार मा. राजेश सुरडकर यांनी गांभीर्याने दखल घेत
मुख्याधिकारी रमेश ढगे यांना याबाबत निर्देश देत दिव्यांग बांधवांचे हक्काचे पैसे दोन-तीन दिवसात दिव्यांगांच्या खात्यात जमा होतील अशी हमी दिली होती. त्यानुसार दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूरचे अध्यक्ष निलेश चोपडे व त्याचे सहकारी हे येणारी दिवाळी दिव्यांग बांधवांची गोड व आनंदात व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांना यश आले असून आज दि. १३आक्टोंबर २०२२ रोजी ६ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश मा. तहसीलदार तथा न.प.प्रशासक राजेश सुरडकर यांच्या हस्ते मुख्याधिकारी रमेश ढगे, उप मुख्याधिकारी पगारे, लेखाधिकारी तनवीर जमादार,प्रकल्फ अधिकारी दिपक खोंडे,आरोग्य अधिकारी योगेश घुगे आदींच्या उपस्थितीत दिव्यांगांना देण्यात आला.
या वेळी निलेश चोपडे यांनी दिव्यांग बांधवाच्या निधीचा धनादेश उपस्थित दिव्यांग बांधवाच्या सुपुर्द केला. तसेच न. प.ची इमारत दोन ते तीन मजली असुन सर्व कार्यालये दुसऱ्या मजल्यावर असुन दिव्यांग बांधवांना आपले शासकीय कामे करण्यासाठी यावे लागते त्यासाठी त्यांना इतरांचा आधार घ्यावा लागतो. बर्याच वेळा त्यांची पडझड होते. त्यासाठी न.प.प्रशासनाने दिव्यांग बांधवांना येण्या- जाण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी. याबाबत मा. तहसीलदार व प्रशासक राजेश सुरडकर तसेच न.प.चे अधिकारी यांचे सोबत चर्चा केली. यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे, सचिव शेख रईस, सहसचिव संतोष गणगे, जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे, सदस्य अंकित नेमाडे, अशोक भालशंकर, प्रकाश वाघ, रोहन चौथे, सुनील पांडव, विवेक राजापुरे, संतोष रायपुरे, इत्यादी सभासद उपस्थित होते.
Post a Comment