मलकापूर ( वडजी):
ग्रामपंचायत वडजी येथील नितीन प्रभाकर बोलके हे मलकापूर तालुक्यातील वडजी गावचे रहिवासी असून ग्रामपंचायत मध्ये कंत्राटी शिपाई या पदावर गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे . आठ ते नऊ महिन्यापासून त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन, वेतन मिळाले नाही. वेळोवेळी सरपंच व ग्रामसेवक यांना माहिती व निवेदन दिल्यावरही त्यांनी वेतन देण्यास टाळाटाळ केली. नितीनच्या कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी त्याच्यावर असून आज रोजी त्याच्या कुटुंबाचा गाडा अत्यंत हलकीच्या जीवनामध्ये तो व त्याचे कुटुंब जगत आहे. त्याला जबाबदार वडजी ग्रामपंचायत आहे. तसेच आता दिवाळी सणवाराच्या दिवसात उपासमारीची वेळ आलेली आहे. थकीत वेतन देण्यास ग्रामसेवक मॅडम व सरपंच मुद्दाम टाळाटाळ करीत आहे .माझ्यावर आलेल्या परिस्थितीला वडजी ग्रामपंचायत व सरपंच ,ग्रामसेवक जबाबदार राहणार आहेत जर माझे वेतन मला मिळाले नाही तर मी उपोषणास बसण्यास तुम्ही मला प्रवृत्त करीत आहात. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर या घटनेशी ग्रामसेवक व सरपंच हे दोषी असतील असे नितीन प्रभाकर बोलके यांनी न्यूज हनुमान सेना संपादकाशी बोलताना सांगितले. याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का
Post a Comment