अभिनव कला सांस्कृतिक बहुउद्देशिय मंच नांदुरा द्वारा प्रकाशित ' *अभिनव नांदुरा* ' या दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते हर्षपूर्ण वातावरणात पार पडला
बुलढाणा ( नांदुरा) : २० ऑक्टोबर २०२२ रोजी नांदुरा येथे आदरणीय आचार्य श्री. हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आणि मलकापूर मतदार विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री राजेशजी एकडे साहेब आणि इतर मान्यवरांनी दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन केले .नांदुरा शहराच्या इतिहासातील मौलाचा दगड ठरलेल्या या दिवाळी अंकामध्ये नांदुरा शहराचा इतिहास, विविध संस्था, ऐतिहासिक स्थळे, व्यक्ती विशेष, धार्मिक स्थळे,नांदुरा शहराचा सांस्कृतिक इतिहास सोबतच बऱ्याच नामवंत साहित्यिकांचे यात लेखन साहित्य असणार आहे. अभिनव नांदुरा विशेषांकाच्या रुपात वाचकांना एक अनमोल ठेवाच मिळणार आहे .आपल्याला नक्कीच नवनवीन माहिती आणि ज्ञानात भर पडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणारआहे. यासाठी आचार्यांनी व मा.आमदार साहेबांनी दिवाळी अंकाचे विशेष कौतुक करीत या अंकाचे सर्वांनी किमान एकदा तरी वाचन करून हा अंक संग्रहीत ठेवावा असे प्रकाशनानंतर आवाहन करण्यात आले .
यावेळी विविध संस्थेच्या मान्यवरांनी आपल्या भाषणात विशेषांका विषयी आपली मनोगते व्यक्त केली . यावेळी साहित्य क्षेत्रातील सर्वश्री मुकुंद चोपडे सर, प्रा. मेश्राम सर, काळवीट सर,रवी ठाकूरसर, राजेश गावंडे, तायडे सर, डॉ संदीप डवंगे, डॉ.राजेंद्र गोठी,अजयभाऊ घनोकार,ह. भ. प. शिवाजी महाराज झामरे,वामनराव भगत सर,केदार भाऊ ढोरे,ज्ञानदेव अंबुस्कर, रुस्तम होनाळे सर,नारखेडे काका,लहू ठाकरे,बाळु चोपडे,रामकृष्ण पाटील,चोबे जी,वामन फंड,अनंत वदोडे,विजय डवंगे,गणेश नायसे,संतोष अवचार,लांडे भाऊ,मोहन काळे,डॉ शरद पाटील,सौ सरिताताई बावस्कार,दयाराम निंबाळकर,वानखडे सर,मोहन काळे,लक्ष्मण वक्टे उपस्थित होते .अध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या अभिनव प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचलन दीपक फाळके सरांनी केले तर वामनराव भगत सरांनी पाहुण्यांचे धन्यवाद मानले .
Post a Comment