Hanuman Sena News

ग्रामपंचायत निवडणूकीत "काटे की टक्कर" कोणत्या पक्षाला किती यश ...




  राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार १६५ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदाच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी रविवारी १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. सोमवारी (१७ ऑक्टोबर) याच १०७९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. मात्र, भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडी असा विचार केला तर मविआला अधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गट अशा एकूण ३५२ ठिकाणी विजय मिळाला, तर मविआने ४५१ ठिकाणी विजय मिळवला.  


Post a Comment

Previous Post Next Post