बुलढाणा : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हाती आलेल्या धान्य विक्रीसाठी बाजारात आणणे सुरू केले आहे. परंतु सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनचे दर अद्यापही साडेतीन ते चार हजाराच्या आसपास आहेत. सोयाबीनचे आता दर वाढले तर यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदा खरिपाच्या प्रारंभी पासूनच शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा सामना करावा लागला. या अस्मानी संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी उडीद, मुंगसह इतर पिके घेतली. परंतु पिके काढणीच्या वेळेतच पुन्हा परतीचा जोरदार पाऊस पडला आहे. अशाही स्थितीत विविध उपाययोजना करून पिके काढून घेण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. यावर्षी पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत सोयाबीनचे दर गेलेले होते. यामुळे यंदा पेरा वाढला मात्र आता उत्पादन हाती येण्याच्या कालावधीतच सोयाबीनचे दर केवळ साडेतीन ते चार हजार रुपयांच्या घरात आहेत. शेतकरी माल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत .अशा स्थितीत दर वाढ झाली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा सोयाबीनचे दर वाढविणे गरजेचे आहे पावसामुळे सोयाबीन भिजले आहे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या सोयाबीनमध्ये आद्रता अधिक दिसून येत आहे. अधिक आद्रता असल्यामुळे या सोयाबीनलाही बाजारपेठेत कमी दर मिळत आहे
सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी...
Hanuman Sena News
0
Post a Comment