बुलढाणा : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या एका भाषणाची बुलढाणा जिल्ह्यात चांगली चर्चा झाली खामगाव जालना रेल्वे मार्गासंबंधी दानवे यांनी केलेल्या विधानाबद्दल बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी काल बुलढाणा येथे स्पष्टीकरण दिले बुलढाणा जिल्हा वाशियांनो कोणतेही काळजी करण्याची गरज नाही खामगाव जालना रेल्वे मार्ग होणार म्हणजे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले रावसाहेब दानवें यांची भाषणाची एक विशिष्ट शैली आहे. त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला जालना जळगाव रेल्वे मार्ग हा स्वतंत्र विषय आहे .त्या विषयामुळे खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी 2009 च्या आधी खामगाव जालना रेल्वे मार्गाची केवळ मागणी होती. मात्र आपण पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर संसदेत या मागणीला वाचा फोडण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. खामगाव जालना रेल्वेची अंतिम लाईन तयार झालेली आहे .त्यात कुठे कुठे रेल्वे स्टेशन होणार आहेत हे सुद्धा फायनल झालेले आहे. एकूण सोळा स्टेशन पैकी बारा स्टेशन बुलढाणा जिल्ह्यात तर चार स्टेशन जालना जिल्ह्यात होणार असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गाचा संपूर्ण नकाशा दाखवला अंतिम डीपीआर आठ ते दहा दिवसात रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाईल हा केवळ केंद्र सरकारचा विषय नसून राज्य सरकारला सुद्धा एकूण खर्चाचा पन्नास टक्के वाटा उचलावा लागणार आहे. त्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून या आधीच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केला असल्याचे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.
खामगाव जालना रेल्वे मार्ग होणारच ...खा. प्रतापराव जाधव
Hanuman Sena News
0
Post a Comment