Hanuman Sena News

शिंदे सरकारच्या काळात गुजरातला "अच्छे दिन" महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पापैकी ३ गुजरातला ...



महाराष्ट्राच्या हातून मागील तीन महिन्यांमध्ये चार मोठे प्रकल्प निसटले आहेत. या सर्व प्रकल्पांची एकंदर किंमत १ लाख ८० हजार कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे राज्यामधील सत्तांतरणानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केल्यानंतरच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातून चार महत्त्वाचे प्रकल्प अन्य राज्यात गेले आहेत. यामुळे राज्यामधील एक लाख नोकऱ्यांची संधीही हिरावली गेली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या एक लाख जणांच्या हाती रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असता.गुरुवारी टाटा-एअरबसने त्यांचा विमान २२ हजार कोटींचा विमान निर्मिती कारखाना गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. मागील तीन महिन्यात महाराष्ट्राच्या हातून निसटलेला हा चौथा प्रकल्प ठरला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प नागपूरमधील मिहान येथे उभारण्यासंदर्भातील दावे यापूर्वी केले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये सहा हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध झाला असता. अशाच प्रकारे 154 लाख कोटीचा वेदांत फॉक्सकोणचा प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून मागील महिन्यात निसटला सेमी कंडक्टर बनवण्याचा या कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रामधील तळेगाव येथील औद्योगिक महामंडळाच्या क्षेत्रामध्ये उभारला जाणार होता यासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये अचानक कंपनीचे गुजरात मधील ढोलेरा येथे हा प्रकल्प उभारण्यासंदर्भात तेथील राज्य सरकार बरोबर सामंजस्य करार केला या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये अंदाजे एक लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश असलेल्या ड्रग पार्क प्रकल्पांसाठी विचाराधीन असलेले महत्त्वाचे राज्य होतं हा प्रकल्प जवळ जवळ 3000 कोटीचा होता यामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 50000 लोकांच्या हाती रोजगार लागणार होता यासाठी रत्नागिरी मधील रोह आणि मुरुड मधील जागा देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न होता दोन्ही तहसीलमध्ये एकूण पाच हजार एकराची जागा देण्याचा विचार सुरू होता मात्र एक सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने यासाठी हिमाचल प्रदेश गुजरात आणि आंध्र प्रदेश ला मान्यता दिली मागील आठवड्यांमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून आलेला 424 कोटीचा वैद्यकीय उपकरणांच्या निर्मिती संदर्भातील प्रकल्प नाकारला हा प्रकल्प औरंगाबाद मधील हरिक सिटी मध्ये उभारण्यात येणार होता मात्र आता तो तामिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश मध्ये हलवण्यात आला आहे यापूर्वी 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता विशेष पुढाकारांतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला यामधून तीन हजार जणांना नोकऱ्या मिळणार होत्या

Post a Comment

Previous Post Next Post