Hanuman Sena News

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर...



राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 2 नोव्हेंबर 2021 ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.मागच्या काही दिवसांआधी अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला आहे.जामीन मंजूर पण तुरुंगाबाहेर नाही!
अनिल देखमुख यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. यातील ईडीच्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण त्यांच्यावर सीबीआयचाही गुन्हा दाखल आहे. सीबीआयच्या केसमध्येही त्यांना जामीन मंजूर होत नाही, तोवर ते तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत.1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग केसमध्ये अटक झाली होती. कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक झालेली. अखेर त्यांना जामीन मिळाला आहे

Post a Comment

Previous Post Next Post