बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील आजी व नातीचा मृत्यू झाला आहे.लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.लोणार तालुक्यातील बिबी येथून ७ ऑक्टोबरला रात्री ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर ही महिला तीन वर्षाच्या कल्याणीसह लक्ष्मीबाईच्या मुलीची मुलगी पायल शिंदे (७) आणि कल्याणीचा पाच वर्षाचा भाऊ चेतन मुधोळकर यांच्यासह बसली होती. दरम्यान यातील चेतन आणि पायल हे या अपघातामध्ये जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात येत आहेत.हे कुटुंब बिबी परिसरात गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या सहकार्याने राहाण्यासाठी आले होते. मोलमजुरी करून ते उपजिविका करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सद्वारे ते मुंबईला कामासाठी जात असावे असा कयास आहे. ते नेमके कोठे जात होते याची सविस्तर माहिती मात्र मिळू शकली नाही. लक्ष्मीबाई मुधोळकर समवेत तिची तीन वर्षाची नात कल्याणी आकाश मुधोळकर, पायल शिंदे (७) आणि चेतन मुधोळकर हेही जात होते.नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते.दरम्यान या दोघींचीही अेाळख महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पटविण्यात आली होती. सोबतच दोघींच्या मृत्यूची माहिती बिबी येथील पोलिस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी मृतकांच्या नातेवाईकाना दिली.बिबी येथून काही जण चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये कदाचीत बसेल असावेत त्याची आपणास बीबी येथून काही जण चिंतामणी ट्रॅव्हल्स मध्ये कदाचित बसले असावेत त्याची आपणास कल्पना नाही ज्या व्यक्ती बसल्या त्या पनवेल मार्गे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स द्वारे गेल्याची बीबी येथील ट्रॅव्हल एजंट बापू देशमुख यांनी सांगितले सोबतच रात्री जोरदार पाऊस असल्याने नेमके बसद्वारे कोण गेले हे सांगता येत नसल्याचे ते म्हणाले सोबतच आपल्याकडून बुकिंग झालेली नव्हती असेही देशमुख म्हणाले त्यामुळे या ट्रॅव्हल्स साठी बीबी येथील या मृत व जखमी व्यक्तींची तिकिटाचे बुकिंग कोणी केले होते असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे या ट्रॅव्हल्स मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते या कयासास कुस्ती मिळत आहे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही त्या अनुषंगानेच प्रसार माध्यमांशी बोलताना संकेत दिले
नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मृतक बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील...
Hanuman Sena News
0
Post a Comment